जिल्ह्याचा पारा ४० अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST2021-03-31T04:17:53+5:302021-03-31T04:17:53+5:30
मागील दोन आठवड्यांपासून ऊन तापू लागले असून, नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. चार दिवसांपासून ३८ ते ...

जिल्ह्याचा पारा ४० अंशांवर
मागील दोन आठवड्यांपासून ऊन तापू लागले असून, नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. चार दिवसांपासून ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत राहणारे जिल्ह्याचे तापमान २९ मार्च रोजी ४० अंशांवर पोहोचले आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय करावे लागत आहेत. घरोघरी कुलर्स बसविण्यात आले आहेत. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल्स आणि रुमालाचा वापरही वाढला आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. येत्या चार दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. या काळात ४२ अंशांपर्यंत पारा पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.