शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटला असून, शनिवारी ७ हजार २४२ तपासण्यांमध्ये २२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटला असून, शनिवारी ७ हजार २४२ तपासण्यांमध्ये २२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्‍क्‍यांपर्यंत घटला आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोना चाचण्या वाढविल्यानंतरही रुग्णांचे प्रमाण वाढलेले नाही. दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढला होता; मात्र तो आता ३ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. शनिवारी आरोग्य विभागाला ७ हजार २४२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ७ हजार ६१ तपासण्यांमध्ये १९८ आणि रॅपिड टेस्टच्या १८१ तपासण्यांमध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना संसर्ग घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ८६१ झाली असून, त्यापैकी ४३ हजार ६८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १९० रुग्णांचा कोरोनाने आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या २ हजार ९८५ रुग्ण उपचार घेत आहेत.

आठ रुग्णांचा मृत्यू

बाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी ८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या ८ रुग्णांमध्ये ६ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.