केंद्र, राज्य सरकारच्या धोरणावर औषध विक्रेत्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST2021-05-20T04:17:59+5:302021-05-20T04:17:59+5:30
यासंदर्भात द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. याच ...

केंद्र, राज्य सरकारच्या धोरणावर औषध विक्रेत्यांची नाराजी
यासंदर्भात द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही राज्य व केंद्र शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. कोरोना संसर्ग काळात औषध विक्रेत्यांचा संपर्क बाधित रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी येतो. त्यातून अनेक औषध विक्रेते कोरोनाबाधित बनले आहेत. स्वतःचाजीव धोक्यात घालून औषध विक्रेते कोरोनासारख्या संकटकाळात रुग्णांना सेवा देत आहेत; परंतु या औषध विक्रेत्यांना कोरोना योद्धा म्हणून समाविष्ट करून घेतले नाही. त्याचप्रमाणे लसीकरणासारख्या मोहिमेतही प्राधान्य दिले गेले नाही. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास औषध विक्री व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र कॉमर्स अँड ड्रगिस्ट असोसिएशनसह जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके यांनी दिला आहे.