सुखप्राप्तीसाठी धम्म आचरण महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:12+5:302021-02-05T06:04:12+5:30
पूर्णा : जीवनात सर्वांना सुखाची अपेक्षा असते. अपेक्षित सुख प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी धम्म आचारण महत्त्वाचे आहे, असे ...

सुखप्राप्तीसाठी धम्म आचरण महत्त्वाचे
पूर्णा : जीवनात सर्वांना सुखाची अपेक्षा असते. अपेक्षित सुख प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी धम्म आचारण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भदन्त धम्मसेवक महाथेरो यांनी केले.
भदन्त उपाली थेरो यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित १८ व्या धम्म परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, तर प्रमुख पाहुणे म्हणून भदन्त धम्मसेवक महाथेरो, भदन्त इंदवंश महाथेरो, भदन्त विनयप्रिय बोधी थेरो, भन्ते पैय्यापीस, भन्ते काश्यप थेरोे, भन्ते पैय्यारत्न थेरो, भन्ते सुभूती, भन्ते संघपाल, भन्ते संघप्रिय, भन्ते बोधीधम्म, भन्ते पैय्यावंश, भन्ते शीलरत्न, भन्ते बुद्धभूषण यांच्यासह डॉ. एस.पी. गायकवाड, आ. रत्नाकर गुट्टे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्राचार्य मोहन मोरे, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, श्यामराव जोगदंड, ॲड. धम्मा जोंधळे, अनिल खर्ग खराटे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड आदी उपस्थित होते. सकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर चौक येथे धम्म ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १ वाजता परिषदेचे उद्घाटन झाले. भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक, बुद्धविहार समिती, भारतीय बौद्ध महासभा आणि महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.