परभणी जिल्ह्यात देऊळगावकरांना आता बिबट्याची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:18 IST2018-03-06T00:18:10+5:302018-03-06T00:18:30+5:30
पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूरनंतर देऊळगाव दुधाटे गावाच्या शेत शिवारामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने परिसरात बिबट्या फिरत असल्याची शंका निर्माण झाली असून, गावकºयांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे़

परभणी जिल्ह्यात देऊळगावकरांना आता बिबट्याची धास्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव बाळापूरनंतर देऊळगाव दुधाटे गावाच्या शेत शिवारामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने परिसरात बिबट्या फिरत असल्याची शंका निर्माण झाली असून, गावकºयांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे़
पिंपळगाव बाळापूर येथे १ मार्च रोजी एका हिंस्त्र पशूने शेळीच्या पिलांवर हल्ला केला होता़ त्यानंतर वन विभागाच्या अधिकाºयांनी हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट केल़े ही घटना ताजी असतानाच गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या देऊळगाव दुधाटे येथील भानुदासराव दुधाटे यांच्या उसाच्या फडात एका महिलेने बिबट्या सदृश्य प्राणी पाहिला़ महिलेच्या सांगण्यावरून ग्रामस्थ त्या भागात गेले असता, या प्राण्याने डरकाळी फोडल्याचेही सांगितले जात आहे़ तसेच त्या ठिकाणी उमटलेल्या पायांच्या ठस्यांचे फोटो गावकºयांनी मोबाईलमध्ये घेतले आहेत़ याबाबत पोलीस व वन खात्याला माहिती देण्यात आली़ त्यानंतर परभणी येथील वनपाल चंद्र मोेघे यांनी देऊळगाव दुधाटे येथे घटनास्थळी भेट देऊन त्या प्राण्यांच्या पायांचे ठसे असलेल्या जागेची पाहणी केली़ जिल्ह्यामध्ये वाघ नसल्याचेही वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले़ दरम्यान वरिष्ठांशी चर्चा करून पुढील उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही वनपाल मोघे यांनी सांगितले़