"परभणी मनपासाठी योजनांची माहिती घ्या"; अजित पवारांचे बैठकीतून प्रधान सचिवांना फोन

By राजन मगरुळकर | Updated: April 26, 2025 15:01 IST2025-04-26T14:59:41+5:302025-04-26T15:01:00+5:30

अजित पवार परभणीच्या विकासाठी आग्रही; थेट बैठकीतूनच लावला प्रधान सचिवांना फोन

Deputy Chief Minister Ajit Pawar calls Principal Secretary directly from meeting on Parbhani issue | "परभणी मनपासाठी योजनांची माहिती घ्या"; अजित पवारांचे बैठकीतून प्रधान सचिवांना फोन

"परभणी मनपासाठी योजनांची माहिती घ्या"; अजित पवारांचे बैठकीतून प्रधान सचिवांना फोन

परभणी : शहर मनपाच्या आढावा बैठकीसाठी परभणी महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. पालिकेची प्राथमिक स्थिती आणि सध्याची आर्थिक स्थिती यावर त्यांनी आयुक्त धैर्यशील जाधव यांच्याकडून पीपीटीद्वारे आढावा घेतला. यानंतर बैठकीतून त्यांनी थेट वित्त विभाग तसेच नगरसचिव विभागाचे प्रधान सचिव देवरा, गोविंदराज यांच्याशी संवाद साधला. परभणी मनपाचे आर्थिक स्थितीबाबत त्यांनी काय काय उपाययोजना करता येतील याबाबत माहिती घेण्यास सांगितले. 

याप्रसंगी उपस्थित पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहुल पाटील, विक्रम काळे यांच्यासह अधिकारी रघुनाथ गावडे, आयुक्त धैर्यशील जाधव आणि मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. परभणी महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत व रखडलेल्या योजनांच्या प्रश्नावर तसेच जीएसटी अनुदान आणि पगारासाठी लागणाऱ्या निधीबाबत मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला प्रधान सचिव देवरा यांच्यासह गोविंदराज यांना थेट फोन लावून परभणीतील महापालिकेची स्थिती सांगितली. 

आधी ड्रेनेज योजना करा मग रस्ते
शहरातील महापालिकेच्या हद्दीत ड्रेनेज योजना नाही आणि एकीकडे रस्त्यावर खर्च केला जात आहे. पुन्हा रस्ते खोदणार का ड्रेनेज योजनेसाठी असे म्हणून त्यांनी समांतर जलवाहिनी सोबत महापालिकेच्या जुन्या इमारतीबाबतही विचारणा केली. शिवाय कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास पैसे नाहीत, कसा काय कारभार चालतो असेही ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी कामाबाबत विचारणा केली.

उपहासात्मक टोला 
परभणी शहर महापालिकेची तसेच शहराची एकंदरीत स्थिती आणि विविध प्रश्न, कचरा, स्वच्छता, रखडलेली कामे, नागरिकांना हवे असलेल्या सुविधा या का दिल्या जात नाहीत. सुविधा मिळाल्याच पाहिजेत त्यासाठी आमचा आग्रह आहे. जगात जर्मनी भारतात परभणी असे बोलले जाते. त्यामुळे त्यांनी यंत्रणेला व परभणीच्या विकासाबाबत उपहासात्मक तोला लगावला.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar calls Principal Secretary directly from meeting on Parbhani issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.