परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:42 IST2019-03-09T00:42:24+5:302019-03-09T00:42:42+5:30
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यांसाठी मायनॉरिटी डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यांसाठी मायनॉरिटी डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून कामगारांच्या हितासाठी असणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जाणीवपूर्वक समस्या निर्माण केल्या जातात. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर संस्थापक सचिव महेबुब खान पठाण, जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर, शेख उस्मान शेख इस्माईल, शेख गणी शेख रहेमान आदींच्या स्वाक्षºया होत्या.