पथदिवे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:50+5:302021-07-03T04:12:50+5:30
पाथरी : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. आतापर्यंत जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. ...

पथदिवे सुरू करण्याची मागणी
पाथरी : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. आतापर्यंत जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दुर्गंधी पसरली
परभणी : शहरातील गांधी पार्क भागात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असून या भागात दुर्गंधी वाढली आहे. मनपाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
वाळूची मागणी
परभणी : घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू प्रशासनाकडून उपलब्ध करून द्यावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याने घरकुलांची कामे ठप्प आहेत.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील धार रोड तसेच खंडोबा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने याकडे लक्ष द्यावे.