मतदान केंद्रनिहाय लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST2021-05-05T04:28:20+5:302021-05-05T04:28:20+5:30
१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु, लसीचा साठा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यामध्ये गोंधळाची स्थिती ...

मतदान केंद्रनिहाय लसीकरणाची मागणी
१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु, लसीचा साठा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लसीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने लसीची योग्य ती मागणी नोंदवावी, शहरी तसेच ग्रामीण भागात लसीकरणाचा आराखडा तयार करून सत्र राबवावे. लसीकरण करताना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर वेगळी नोंदणी करण्याची व्यवस्था करावी. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांची मदत घ्यावी, अशी मागणी ‘प्रहार’चे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर आदींनी केली आहे.