गूळवेल, गवती चहा, काळी हळदची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST2021-05-06T04:18:13+5:302021-05-06T04:18:13+5:30
परभणी शहरात ॲग्रो नर्सरी व अन्य झाडांची लागवड करणाऱ्या नर्सरीची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एरव्ही पावसाळ्यात झाडे लावण्याकरिता ...

गूळवेल, गवती चहा, काळी हळदची मागणी वाढली
परभणी शहरात ॲग्रो नर्सरी व अन्य झाडांची लागवड करणाऱ्या नर्सरीची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एरव्ही पावसाळ्यात झाडे लावण्याकरिता नागरिक नर्सरीकडे वळतात. इतर कालावधीत झाडांच्या नर्सरीकडे दुर्लक्ष केले जाते. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या या संकटकाळात इम्युनिटी वाढविणाऱ्या रोपांची मागणी वाढली आहे. यासोबतच अन्य पर्यायी वनस्पतीची मागणी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामध्ये गवती चहा, काळी हळद, गूळवेल, तुळस, अश्वगंधा, आद्रक अशा रोपांची लागवड घरोघरी झाडांमध्ये केली जात आहे.
येथून येतात रोपे
परभणीत नर्सरीमध्ये मिळणारी काही रोपे ही पुणे, कलकत्ता, विशाखापट्टण, मद्रास, म्हैसूर येथून येतात. तर अन्य काही रोपे स्थानिक पातळीवर नर्सरीमध्ये बनविली जातात.
ऑक्सिजन देणारी झाडे
आरेका फार्म, कडुनिंब, बांबू, थूजा मोरपंखी, ॲस्प्रा, ख्रिसमस ट्री
इम्युनिटी वाढवणारी झाडे
गवती चहा, काळी हळद, गूळवेल, इन्सुलिन, सफेद मुसळी, मोहगुणी सीड,
सध्या इम्युनिटी आणि ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मागणी वाढली आहे. कडुनिंबाची झाडे जास्त लावणे गरजेचे आहे. सध्या वाढणारे मृत्यू पाहता स्मशानात कडुनिंबाच्या तोडलेल्या लाकडाचा वापर जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे कडुनिंबाच्या झाडांची कत्तल वाढली आहे.
- सचिन सरदेशपांडे, नर्सरीचालक.
गूळवेल, कडुनिंब आणि मोहगुणी सीड याची मागणी वाढली आहे. इम्युनिटी वाढविण्यासाठी यांचा वापर केला जातो. मोहगुणी कोमट पाण्यात घ्यावे, जेणेकरून मधुमेह, रक्तदाब यांचा त्रास कमी होतो.
- प्रितम चक्रवार, नर्सरीचालक.