बाधित पिकांचा विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST2021-03-08T04:17:25+5:302021-03-08T04:17:25+5:30

धुळीच्या लोटामुळे प्रवास बनला कठीण परभणी : गंगाखेड-परभणी या रस्त्यावर जागोजागी काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर पाणी ...

Demand for insurance of affected crops | बाधित पिकांचा विमा देण्याची मागणी

बाधित पिकांचा विमा देण्याची मागणी

धुळीच्या लोटामुळे प्रवास बनला कठीण

परभणी : गंगाखेड-परभणी या रस्त्यावर जागोजागी काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर पाणी टाकले जात नसल्याने धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणे कठीण झाले असून, अपघात वाढले आहेत. गंगाखेड-पालम या रस्ता निर्मितीचे काम सध्या सुरू आहे.

सिंचन विहिरींची कामे संथगतीने

परभणी : ग्रामीण भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत सार्वजिनक विहीर खोदण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू आहे.

शहरात दुभाजक बसविण्याची मागणी

परभणी : शहरातील गव्हाणे चौक ते नवा मोंढा भागात जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षांपूर्वी तकलादू दुभाजक बसविण्यात आले होते. त्यामधून वाहनधारक सर्रासपणे ये-जा करतात. त्यामुळे या भागात उंच दुभाजक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Demand for insurance of affected crops