ग्रामसडक योजनेच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:32+5:302021-04-19T04:15:32+5:30
शहरातील नालीवरील ढापे तुटू लागले परभणी : शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील नालीवरील ढापे तुटू लागले आहेत. संबंधित कंत्राटदाराने हे ...

ग्रामसडक योजनेच्या चौकशीची मागणी
शहरातील नालीवरील ढापे तुटू लागले
परभणी : शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील नालीवरील ढापे तुटू लागले आहेत. संबंधित कंत्राटदाराने हे ढापे निकृष्ट दर्जाचे बसविले होते. त्यामुळे ते तुटत आहेत. यासंदर्भात अनेक वेळा तक्रार करूनही महानगरपालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही.
उजव्या कालव्याची दुरवस्था
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दोन वर्षांमध्येच दुरवस्था झाली आहे. जिंतूर तालुक्यातील कुंभारी, मारवाडी, पिंपळगाव, कौसडी आदी गाव परिसरातील या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या फरशा जागोजागी उखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाला रानडुकरांच्या उपद्रवाची माहिती दिली. मात्र, वन विभागाच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांची गैरसोय अद्याप दूर झालेली नाही.