बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:25+5:302021-02-27T04:23:25+5:30
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्णा तालुक्यातील कमलापूर, लिमला, दस्तापूर या गावांसाठी परभणी येथील बँक ऑफ बडोदा मुख्य ...

बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्णा तालुक्यातील कमलापूर, लिमला, दस्तापूर या गावांसाठी परभणी येथील बँक ऑफ बडोदा मुख्य शाखा ही बँक दत्तक आहे. मागील ७ ते ८ महिन्यांपासून ठरावीक शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रकरण बँकेकडून हेतुपुरस्सर टाळले जात आहेत. मर्जीतील व्यक्तींचे कर्जप्रकरणे मंजूर केले जात आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तिन्ही गावांमधील ५५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश बँकेला द्यावेत, अन्यथा पक्षाच्या वतीने बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात बोधने यांनी म्हटले आहे. निवेदनावर गजानन चोपडे, नारायण ढगे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, सोमनाथ सूर्यवंशी, परमेश्वर हिंगे, आत्माराम हिंगे, बालाजी हिंगे, शाम सूर्यवंशी आदींची नावे आहेत.