शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅबच्या अहवालासाठी विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यात स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आल्यानंतरही ते अहवाल प्राप्त होण्यास तीन दिवसांचा कालावधी लागत ...

परभणी : जिल्ह्यात स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आल्यानंतरही ते अहवाल प्राप्त होण्यास तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने स्वॅब नमुने दिलेल्या नागरिकांना मात्र अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेतील स्वॅब नमुने तपासण्याची गती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी सुरू करण्यात आली. मात्र परभणी येथे प्रयोगशाळा नसल्याने स्वॅब नमुने सुरुवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत, त्यानंतर औरंगाबाद व नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली जात होती. त्यासाठी मोठा वेळ खर्ची घालावा लागत असे. त्यामुळे मागील वर्षीच जिल्ह्यात स्वॅब नमुने तपासण्याची प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीला २०० स्वॅब नमुने तपासण्याची या प्रयोगशाळेची क्षमता होती. ती आता २२०० पर्यंत झाली आहे. आरोग्य विभागाने अद्ययावत मशीन खरेदी करुन स्थानिक पातळीवरच स्वॅब नमुने तपासण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे जिल्हावासियांची गैरसोय दूर झाली. स्वॅब नमुन्यांचे अहवाल तातडीने प्राप्त होतील, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली असून, नागरिकांना तीन ते साडेतीन दिवसांपर्यंत अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत केवळ स्वॅब चाचण्या वाढवून चालणार नाही तर त्याचे अहवालही नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचती करण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही अहवाल देण्यासाठी गती मिळालेली नाही. परिणामी रुग्णांचे निदान लागण्यासही विलंब होत असून, यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

अशी केली जाते चाचणी...

जिल्ह्यात ठिकठिकाणी सध्या नागरिकांचे स्वॅब नमुने घेतले जातात. स्वॅब घेतल्यानंतर त्याची एस.आर.ए. फाईल तयार केली जाते. या नमुन्यांना रुग्णाच्या नावासह स्टीचिंग केल्यानंतर ते प्रयोगशाळेत पाठविले जातात. या प्रक्रियेसाठी साधारणत: एक दिवसाचा वेळ लागतो. प्रयोगशाळेत स्वॅब नमुना प्राप्त झाल्यानंतर स्वॅबमधील आरएनए घटक वेगळा करुन स्वॅब मशीनच्या स्लॉटमध्ये ठेवून त्यावरुन चाचणी केली जाते. या प्रक्रियेला साधारणत: दीड तासाचा वेळ लागतो. या प्रयोगशाळेकडे सध्या ७०० ते ८०० स्वॅब दररोज प्राप्त होत आहेत. प्रयोगशाळला स्वॅब प्राप्त झाल्यानंतर एका दिवसांत अहवाल देणे अपेक्षित आहे.

स्लॉटची संख्या वाढविण्याची आवश्यकता

येथील प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये विविध प्रकारचे स्लॉट आहेत. काही मशीनमध्ये पाच तर काही मशीनमध्ये १० स्लॉट आहेत.याचाच अर्थ एकाच वेळी ५ ते १० स्वॅब नमुन्यांची तपासणी करणे शक्य आहे. या स्लॉटची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.