ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: October 22, 2014 13:30 IST2014-10-22T13:30:46+5:302014-10-22T13:30:46+5:30
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर ताडबोरगाव जवळ एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला मृत्यू पावली. ही घटना ३0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता घडली.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
गुन्हा दाखल :ताडबोरगावजवळ घडलेली घटना
मानवत : राष्ट्रीय महामार्ग २२२ वर ताडबोरगाव जवळ एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला मृत्यू पावली. ही घटना ३0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता घडली.
आंबेगाव येथील रमेश दादारावजाधव यांचे नातेवाई शांताबाई प्रकाशराव होंडे यांना आपल्या एम.एच.२२ ए.ई. ७५0४ क्रमांकाच्या दुचाकीवरून घेऊन जात होते. ताडबोरगाव शिवारात गेले असता एका ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात शांताबाई प्रकाश होंडे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्या मरण पावल्या तर रमेश दादाराव जाधव यांनाही दुखापत झाली. या धडकेत दुचाकीचे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाले. रमेश जाधव यांच्या तक्रारीवरून फरार झालेल्या ट्रक वट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.