परभणी जिल्ह्यात झाडावरून पडल्याने शेतकºयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:24 IST2018-03-05T00:24:30+5:302018-03-05T00:24:38+5:30
सेलू तालुक्यातील जिवाजी जवळा येथील शेतकरी उद्धवराव खरात यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला़

परभणी जिल्ह्यात झाडावरून पडल्याने शेतकºयाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील जिवाजी जवळा येथील शेतकरी उद्धवराव खरात यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला़
उद्धवराव विठ्ठलराव खरात (५०) हे २ मार्च रोजी शेतात गेले होते़ त्यांनी दिवसभर कापूस वेचला व सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी उद्धवराव खरात हे झाडावर चढले होते़
या दरम्यान त्यांचा तोल गेल्याने १० फुट उंचीवरून ते खाली पडले़ त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगितलल्याने त्यांना नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते़ तेथे उपचार सुरू असताना २ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़
३ मार्च रोजी जिवाजी जवळा येथील शेतात उद्धवराव खरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे़ खरात कुटुंबियांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी सरपंच अशोकराव खरात यांनी केली आहे़