ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 12:11 IST2020-12-23T12:06:28+5:302020-12-23T12:11:45+5:30

श्रीगुरु कांचबसवेश्वर मठसंस्थान चा भाविकांचा मराठवाडा व विदर्भात मोठा विस्तार असुन वीरशैव भक्तमंडळी शोकसागरात बुडाली आहे.

Death Basavaling Shivacharya Maharaj at Pathri Math | ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान

ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान

ठळक मुद्देपाथरी येथे होणार समाधी सोहळा

पाथरी (परभणी ) : श्री गुरू कांचबसवेश्वर मठ संस्था चे  मठाधिपती ष. ब्र. १०८ बसवलींग शिवाचार्य महाराज पाथरीकर यांचे बुधवारी ( दि. २३) पहाटे ४:३० वाजता अल्पशा आजाराने पाथरी येथील मठात लिंगैक्य झाले. 

गेल्या काही वर्षांपासुन महाराजांची प्रकृती अस्थिर होती. त्यामुळे सहावर्षांपुर्वीच नुतन मठाधिपतीचा पदभार ष. ब्र. १०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. 

श्रीगुरु कांचबसवेश्वर मठसंस्थान चा भाविकांचा मराठवाडा व विदर्भात मोठा विस्तार असुन वीरशैव भक्तमंडळी शोकसागरात बुडाली आहे. श्री गुरु बसवलींग शिवाचार्य महाराज यांचा समाधी सोहळा आज दुपारी २:०० वाजता श्री गुरू कांचबसवेश्वर मठ संस्थान पाथरी येथे होणार असल्याची माहिती नुतन मठाधिपती श्रीगुरु काशीनाथ महाराज यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील रंभापुरी शाखेतील वीर गोत्राचा पहिला मठ म्हणून पाथरीचा कांचबसवेश्वर मठ संस्थानची ओळख आहे, बसवलींग शिवाचार्य महाराज गेली चाळीस वर्षांपासुन  कांचबसवेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती होते, त्यांच्या जिवनकार्यात महाराष्ट्रातील भाविकांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, दिक्षा समारंभ, भक्त मंडळी वाढवण्याचे काम बसवलींग शिवाचार्य महाराजांनी केले आहे.

Web Title: Death Basavaling Shivacharya Maharaj at Pathri Math