डी. एम. झोडपे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:38+5:302021-02-15T04:16:38+5:30
रोहिला पिंपरीच्या सरपंचपदी दिलीपअप्पा वसमतकर बोरी : जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीपअप्पा वसमतकर, तर उपसरपंचपदी अहत ...

डी. एम. झोडपे यांचा सत्कार
रोहिला पिंपरीच्या सरपंचपदी दिलीपअप्पा वसमतकर
बोरी : जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीपअप्पा वसमतकर, तर उपसरपंचपदी अहत पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोहिला पिंपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या निवडी केल्या. यावेळी किशोरअप्पा वसमतकर, विठ्ठल डुकरे, विजय ढोकर, कासीम पटेल, गंगाधर डुकरे, सुनील वसमतकर, बबनराव गलांडे यांची उपस्थिती होती.
खांबेगावच्या सरपंचपदी मुक्ता कदम
ताडकळस : पूर्णा तालुक्यातील खांबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुक्ता गजानन कदम, तर उपसरपंचपदी इंदुबाई माधव येडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सत्यभागा श्रीरंग जंगले, केशव शेषराव मोहिते, रामचंद्र मारोतराव भोसले, गंगासागर भारत माने यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी भगवंत देसाई, कुंडलिक कदम, रंगनाथ पावडे, नारायण भोसले, नामदेव माने, पंडित कदम, डिगांबर घायाळ, अनंतराव पावडे, सय्यद शमशोद्दीन, नारायण खंदारे, रमेश खंदारे, शेख अब्दुल, यादव कदम, नामदेव भोसले आदींची उपस्थिती होती.
बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करा
गंगाखेड : शहर बाजारपेठेत रस्ते अरुंद व वाहनांची होत असलेली गर्दी त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी बेशिस्त वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे नागरिकांनी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्याकडे केली आहे. निवेदनावर विठ्ठलराव मुंडे, डॉ. विठ्ठल तिडके, बालाप्रसाद भंडारी, शाम नागेशी, अब्दुल हमीद, कुलदीप चौधरी, सुभाष कदम, नितीन जोशी, राजेश घोेगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ
गंगाखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल करूनही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ताडबोरगाव सरपंचपदी नीता काजळे
ताडबोरगाव : मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी महाविकास आघाडीच्या नीता ज्ञानोबा काजळे, तर उपसरपंचपदी उमर खान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी वसंतराव इखे, ग्रामसेवक लोमटे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुंता मंचक जोगदंड, कृष्णा रमेश पठाडे, सागर केशव देशमुख, सुभाष मोरे, माऊली काजळे, मंचकराव जोगदंड, तंटामुक्तीचे अध्यक्ष खदीरखान पठाण, अकबर खान, राम महाराज काजळे यांची उपस्थिती होती.