संचारबंदीचे उल्लंघन; दहा दुकानदारांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:14+5:302021-06-01T04:14:14+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जीवनावश्यक सेवेतील किराणा व भाजीपाला विक्रीची दुकाने वगळता ...

संचारबंदीचे उल्लंघन; दहा दुकानदारांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जीवनावश्यक सेवेतील किराणा व भाजीपाला विक्रीची दुकाने वगळता इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी नाही. असे असताना बाजारपेठेतील काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. मनपा आयुक्त देविदास पवार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशावरून नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक तिप्पलवाड यांनी ३१ मे रोजी कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक, स्टेशन रोड या भागात मोहीम राबविली. यावेळी काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. या दुकानदारांकडून दंड वसूल करण्यात आला. त्यात इमेज मेन्स वेअर, लालपोतू कलेक्शन, वैशाली साडी सेंटर या दुकानदारांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये, तसेच लाइफ मेन्स वेअर, क्लासिक मेन्स वेअर, आरेफ मेन्स वेअर, जीवनी मेन्स वेअर आणि बुशरा बँगल्स या दुकानदारांकडून प्रत्येकी १० हजार रुपये आणि पत्तेवार, अब्दुल कापड दुकान या दुकानदारांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण दहा दुकानांवर कारवाई करीत एक लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत मनपाचे सहायक आयुक्त अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, प्रकाश काकडे, मोहन वाघमारे, आदींनी सहभाग नोंदविला.