निर्बंधातून सूट मिळताच रस्त्यावर उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:28+5:302021-05-12T04:17:28+5:30
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या निर्बंधातून किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, दूध डेअरी ...

निर्बंधातून सूट मिळताच रस्त्यावर उसळली गर्दी
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या निर्बंधातून किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, दूध डेअरी आदी व्यवसायांना १० ते १२ मेपर्यंत सूट देण्यात आली होती. सोमवारी अत्यावश्यक सेवेबरोबर शहरातील व्यापारपेठेत असलेल्या कापड, भांडी, जनरल स्टोअर्स, मोबाईल शॉपी, फुटवेअर, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल साहित्य विक्रीच्या दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन करून आपली दुकाने खुली केली होती. शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यापारपेठेत मोठी गर्दी केल्याने बाजारपेठेतून मार्ग काढणे ही कठीण झाले होते. शहरातील रस्त्यावर उसळलेली गर्दी पाहून कोरोना विषाणूंच्या संसर्गाची वाढती साखळी तुटण्याऐवजी आणखी घट्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यापारपेठेतील दुकानांत अथवा रस्त्यांवर कोणीही नियमांचे पालन करताना आढळून आले नाही, तर व्यापारपेठेत काही काम नसतानादेखील किती बाजार खुला झाला हे पाहण्यासाठी बहुतांश जण तोंडाला मास्क न लावता कोरोनाने मरेल पण गावभर फिरेल अशा आवेगात फेरफटका मारण्याकरिता नेहमीच्या सवयीनुसार घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले.