बसस्थानकावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:42+5:302021-04-13T04:16:42+5:30
मनपाची वसुली ठप्प परभणी : कोरोना संसर्गाचा परिणाम मनपाच्या वसुलीवर झाला आहे. मनपाचे बहुतांश कर्मचारी कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतले ...

बसस्थानकावर गर्दी
मनपाची वसुली ठप्प
परभणी : कोरोना संसर्गाचा परिणाम मनपाच्या वसुलीवर झाला आहे. मनपाचे बहुतांश कर्मचारी कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतले आहेत. तसेच नागरिकही आर्थिक अडचणीत असल्याने करवसुलीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
विजेच्या समस्या वाढल्या
परभणी : ग्रामीण भागात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. वीज समस्यांसंदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांत रोष आहे.
वाळूचा सर्रास उपसा
परभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार बळावला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही वाळू उपसा सुरूच आहे.
नुकसानभरपाई मिळेना
परभणी : मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नसून, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.