शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

परभणी जिल्ह्यात १९ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:23 AM

गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.परभणी हा कृषी व्यवसायावर अवलंबून असलेला जिल्हा आहे. येथील आर्थिक उलाढाल कृषी व्यवसायावरच अवलंबून असते. दरवर्षी खरीप हंगामात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या पीक कर्जासाठी शेतकरी मोठी आशा लावून असतात.तीन वर्षे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकºयांच्या हाती तीन वर्षीच्या खरीप हंगामातून काहीच लागले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. गतवर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १३०४ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व आर्थिक जोखडात सापडलेला शेतकरी पाहून जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे जावून १४०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. उद्दिष्टाच्या १०७ टक्के पीक कर्ज वाटप केले. त्यामुळे शेतकºयांना गत खरीप हंगामात पीक कर्जाचा मोठा हातभार लागला.मागील वर्षी जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला. या पावसावर खरीप हंगामातील पिकेही चांगली बहरली. परंतु, नगदी पीक म्हणून ओखळल्या जाणाºया कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर बोंड अळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकºयांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे. या उद्देशानेच खरीप हंगामासाठी १ हजार ७८३ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार १ मेपासून पीक कर्ज वाटपास सुरुवातही झाली आहे. ११ दिवसांत जिल्ह्यातील सर्व बॅकांनी २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.गतवर्षी पावणेतीन लाख शेतकºयांनी घेतले पीक कर्जजिल्ह्यामध्ये तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांकडे २०१६ च्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यामुळे या शेतकºयांना पीक कर्ज मिळणे आवश्यक होते. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी सहकार्याच्या भावनेने काम केले. २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकांना देण्यात आलेले १३०४ कोटी रुपयांच्या उद्दिष्टांच्या पुढे जावून १४०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ६०० शेतकºयांना या पीक कर्जाचा लाभ मिळाला होता.शेतकरी संभ्रमावस्थेतमहाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे. परंतु, या योजनेअंतर्गत ज्या शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्या शेतकºयांना पूर्व कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे किती शेतकºयांचे कर्ज माफ झाले आहे, याची माहिती शेतकºयांना मिळेनासी झाली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी लागणाºया बियाणे, औषधी व खते घेण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे. मात्र आपले कर्ज माफ झाले की नाही, याच विचारात असलेला शेतकरी सध्या तरी संभ्रामवस्थेत असल्याचे पहावयास मिळते.खरीप हंगामासाठी दाखल झालेले पीक कर्जाचे प्रस्ताव बँक अधिकाºयांनी प्राधान्याने निकाली काढावेत व शेतकºयांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे.- खिल्लारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक