एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:12+5:302021-04-09T04:18:12+5:30

परभणी तालुक्यातील सूर पिंप्री येथील सचिन लहू कांबळे व राजू गायकवाड हे दोन मित्र ११ मार्च रोजी एमएच ४३ ...

Crime on a two-wheeler in the death of one | एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा

एकाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा

परभणी तालुक्यातील सूर पिंप्री येथील सचिन लहू कांबळे व राजू गायकवाड हे दोन मित्र ११ मार्च रोजी एमएच ४३ बीव्ही ७१२८ क्रमांकाच्या दुचाकीवरून पोखर्णी ते सूर पिंप्री रस्त्याने येत असताना दुपारी दोनच्या सुमारास जांभळाच्या झाडाजवळ दुचाकी चालक राजू गायकवाड याने भरधाव वेगाने वाहन चालविले. वळण रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात दुचाकी चालक राजू गायकवाड व पाठीमागे बसलेला त्याचा मित्र सचिन लहू कांबळे हे दोघेही जखमी झाले. त्यात सचिनला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर सचिनला उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना २२ मार्च रोजी सचिन कांबळे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ अविनाश लहू कांबळे याने दैठाणा पोलीस ठाण्यात ७ एप्रिल रोजी फिर्याद दिली. त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालवून सचिन कांबळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राजू गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Crime on a two-wheeler in the death of one