शिविगाळ प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:40+5:302021-02-08T04:15:40+5:30
तालुक्यातील जवळा झुटा येथील फिर्यादी विष्णू अच्युतराव सौदरमल हे गावातील शेत शिवारात ५ फेब्रुवारी रोजी ऊसतोडणीचे काम करत होते. ...

शिविगाळ प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा
तालुक्यातील जवळा झुटा येथील फिर्यादी विष्णू अच्युतराव सौदरमल हे गावातील शेत शिवारात ५ फेब्रुवारी रोजी ऊसतोडणीचे काम करत होते. यावेळी गावातील आरोपी भागवत सटवाजी झुट्टे यांनी ट्रॅक्टरचा जुना हिशोब करण्याची मागणी केली. यावेळी फिर्यादीने हिशोब पूर्ण झाल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपीने ट्रॉली पलटी झाल्याचे पैसे दे, अशी मागणी केल्यावर फिर्यादीने ट्रॉली पलटी झालेचे पैसे चालक देतो का, असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार फिर्यादीने फोनवरून आईला सांगितला. त्यानंतर यासंदर्भात आरोपीला फिर्यादीच्या आईने विचारपूस केली असता त्यांनाही ढकलून देण्यात आले, अशी फिर्याद पाथरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद झाला आहे.