CoronaVirus : परभणीत विलगिकरण कक्षातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 19:55 IST2020-04-08T19:54:36+5:302020-04-08T19:55:08+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षात सुरू होते उपचार

CoronaVirus : परभणीत विलगिकरण कक्षातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
परभणी : तालुक्यातील एका गावातून परभणीतील जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३़३० च्या सुमारास घडली़
परभणी तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोनाच्या विलगीकरण कक्षात मंगळवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते़ बुधवारी दुपारी ३़३० च्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला़ या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरील महिलेला दम्याचा त्रास होता़ तिला कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून येत नव्हती़ तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने मयत महिलेच्या स्वॅबचे नमुने घेवून ते औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़ याबाबतचा अहवाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे़