coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 15:34 IST2020-07-09T15:32:57+5:302020-07-09T15:34:01+5:30

जिल्ह्यात आता १८४ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.

coronavirus: Three more positive patients in Parbhani district | coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण

coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण

परभणी : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता १८४ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट होत चालला आहे. बुधवारी जिल्ह्यामध्ये रेकॉर्डब्रेक २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये धडकी भरली आहे. गुरुवारी दुपारी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये दोन रुग्ण परभणी शहरातील शिवाजी नगर आणि सोनार गल्ली येथील रहिवासी असून, तिसरा रुग्ण जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा येथील रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Web Title: coronavirus: Three more positive patients in Parbhani district