coronavirus : धक्कादायक ! होम क्वारंटाईन केलेल्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 16:55 IST2020-07-18T16:55:17+5:302020-07-18T16:55:47+5:30
स्वॅब आणि अँटीजन किटद्वारे दोन वेळा तपासणी करण्यात आली.

coronavirus : धक्कादायक ! होम क्वारंटाईन केलेल्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
गंगाखेड : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मात्र स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने होम क्वारंटाईन असलेल्या शहरातील एका ६१ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १८ ) पहाटे घडली. शंकर धोंडीराम जेठुरे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने शेटे गल्लीतील रहिवाशी असलेले शंकर धोंडीराम जेठुरे ( ६१) यांचा स्वॅब आणि अँटीजन किटद्वारे दोन वेळा तपासणी करण्यात आली. दोन्ही वेळा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे त्यांना शुक्रवारी होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. प्रविण कांबळे हे करीत आहे. होम क्वारंटाईन असलेल्या जेठुरे यांच्या मृत्यूने शहरात खळबळ उडाली आहे.