coronavirus : धक्कादायक ! परभणीतील कोरोनाबाधित अधिकाऱ्याचा औरंगाबादेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:28 IST2020-08-10T17:25:20+5:302020-08-10T17:28:01+5:30

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात होते कार्यरत

coronavirus: shocking! coronavirus patient officer from Parbhani dies in Aurangabad | coronavirus : धक्कादायक ! परभणीतील कोरोनाबाधित अधिकाऱ्याचा औरंगाबादेत मृत्यू

coronavirus : धक्कादायक ! परभणीतील कोरोनाबाधित अधिकाऱ्याचा औरंगाबादेत मृत्यू

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात डायलेसीससाठी दाखल झाले होतेउपचारादरम्यान त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला

परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका ५८ वर्षीय कोरोनाबाधित अधिकाऱ्याचा औरंगाबाद येथे सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एक ५८ वर्षीय अधिकारी डायलेसीससाठी औरंगाबाद येथील  खासगी रुग्णालयात  दाखल झाले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब त्यांचा स्बॅब घेतल्यानंतर समोर आली होती. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाच्या अनुषंगाने उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अत्यंत शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कृषी विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: coronavirus: shocking! coronavirus patient officer from Parbhani dies in Aurangabad