Coronavirus : राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्यास कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:04 IST2020-07-21T14:03:26+5:302020-07-21T14:04:03+5:30

परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ महिला नेत्याची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.

Coronavirus: Senior female NCP leader infected with coronavirus | Coronavirus : राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्यास कोरोनाची लागण

Coronavirus : राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्यास कोरोनाची लागण

परभणी : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ महिला नेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याचे घर आणि परिसर सील करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ महिला नेत्याची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात या वरिष्ठ महिला नेत्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे शहरातील घर आणि परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुराणी यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,  जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या ४०५ झाली आहे.

Web Title: Coronavirus: Senior female NCP leader infected with coronavirus