शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परभणीकरांना मिळणार घरपोच किराणा; प्रशासनाने विकसित केले अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 14:40 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने गर्दीमध्ये वाढ होत आहे़ त्यातून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता

ठळक मुद्देघरपोच मिळणार किराणा आणि इतर साहित्यकॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा

परभणी : संचारबंदी काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता अँड्रॉईड अ‍ॅप तयार केले असून, या अ‍ॅपद्वारे परभणीकर नागरिकांना घरेपाच किराणा व इतर साहित्य उपलब्ध होणार आहे़

जिल्ह्यामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत आहेत़ त्यामुळे किराणा साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने गर्दीमध्ये वाढ होत आहे़ त्यातून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता असल्याने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता अँड्रॉईड अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे़ 

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून पीबीएन शॉप हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे़ त्याद्वारे नागरिकांना घरी बसून खरेदी करता येणार आहे़ किराणा मालासाठी देखील घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही़ ही सेवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने दिली जाणार आहे़ त्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि मॅप आॅन कंपनीचे सीईओ सचिन बाळासाहेब देशमुख यांच्या वतीने हे अ‍ॅप विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे़ निवासी

उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयसीचे सुनील पोटेकर यांनी संगणक प्रणाली विकसित केली़ त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योत्स्ना धुळे, नायब तहसीलदार विकास पाटील यांचे सहकार्य लाभले़ ६ एप्रिलपासून हे अ‍ॅप कार्यरत झाले आहे़

असे डाऊनलोड करा अ‍ॅपनागरिकांनी गुगल प्ले स्टोअर्समध्ये जावून पीबीएन शॉप हे अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करून घ्यावे़ तसेच संगणकावरही डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीबीएनशॉप डॉट इन या  संकेतस्थळावर ही प्रणाली वापरता येणार आहे़ याद्वारे नागरिकांनी आवश्यक असलेली किराणा मालाची आॅर्डर दिल्यानंतर २४ तासांच्या आत ही आॅर्डर घरपोच पोहचती केली जाणार आहे़ आॅर्डर नोंदविताना नागरिकांना मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता सुस्पष्टपणे नोंदवावा लागाणार आहे़ घरपोच डिलेव्हरी करणारे स्वयंसेवक पावती दाखविल्यानंतर पावतीत नमूद केल्या प्रमाणे रक्कम स्वयंसेवकांना द्यावयाची आहे़ याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाने कॅशआॅन डिलेव्हरीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे़ तसेच यापूर्वी कार्यरत असलेली व्हॉटस्अ‍ॅपद्वारे स्वयंसेवी संस्थांकडून दिली जाणारी सेवाही कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी