शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पायपीट करून आलेल्या मजुरांचे परभणी जिल्ह्याच्या सीमेवर लोंढे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:22 IST

मजुरांचे अन्नपाण्याविना होत आहेत हाल

पाथरी : राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व सिमाबंद केल्या आहेत. मात्र जिल्ह्याच्या सीमांवर बाहेर गावची मजूर शेकडो किमीची पायपीट करून पुढे जाण्यासाठी दाखल होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी ( दि. 2 ) परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव सीमेवरील चेक पॉईंटवर कर्नाटकातून चालत आलेले 10 मजूर आढळून आले. तसेच इतर 22 ऊसतोडणी करणारे मजूर जिल्ह्यात प्रवेश बंद असल्याने अडकून पडले आहेत. 

कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाऊन सोबत संचारबंदी सुरू असल्याने बाहेर अडकलेल्या लोकांचे विशेषतः मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. अडकलेल्यापैकी बहुतांश बाहेर जिल्ह्यातील अथवा कर्नाटकातून परतलेले   ऊसतोड मजूर आहेत. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील लोणी तांड्यावर 92 मजूर याच अवस्थेत आढळून आले होते. त्या सर्वांना आता एका मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात आले. 

ढालेगाव येथे जिल्हा सीमा आहे या ठिकाणी पाथरी पोलिसांच्या वतीने चेक पॉईंट लावण्यात आला आहे, गुरुवारी लोकमत प्रतिनिधीने दुपारी 2 वाजता येथे भेट दिली. यावेळी अत्यावश्यक सेवेची वाहनेसुद्धा पूर्ण तपासणी करून सोडली जात असल्याचे दिसून आले. दुचाकी वाहने केवळ दवाखान्याची कारणे असतानाच सोडली जात होती. याचवेळी वाशीमकडे जाणारे 10 मजूर सीमेवर येऊन दाखल झाले. रोडचे काम करणारे हे सर्व मजूर कर्नाटकातुन 25 मार्च रोजी निघाले होते. 2 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पोहचले  त्यांना तेथेच अडविण्यात आले. यासोबतच 22 ऊस तोड मजूर जळगाव येथे जाण्यासाठी मुकदमा सोबत ट्रॅक्टर ने सकाळी 6 वाजता जिल्हा सीमेवर आले होते. त्यांच्या सोबत 6 लहान मुले आहेत.  तर सकाळी 10 वाजता पंढरपूर येथून वाहनाने आलेली मंठा येथील 12 जण बीड पोलिसांनी वाहन ताब्यात घेतल्यानंतर पायी चालत पाथरी तालुक्यातील ढालेगाव , रामपुरी, वडी मार्गे निघाले होते. वाडी येथील नागरिकांनी त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. त्या नंतर वडी येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये नोंदणी केल्या नंतर त्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली. जिल्ह्याच्या सीमेवरून सर्व मजूर गावाकडचा रस्ता पकडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी