शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आता आली 'एसआरपी'ची बारी; पराभणीकरांना होईल का गांभीर्याची जाणीव ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:17 IST

एसआरपीची तुकडी सोमवारी रात्रीच दाखल झाली आहे

ठळक मुद्देबुधवार पासून प्रत्यक्ष उपाययोजना सुरू केली जाणारपोलिसांकडून अनेक उपाय योजना

परभणी :  संचारबंदीच्या काळात नागरिकांना नियमांची शिस्त लावत घरीच बसणे बंधनकारक करण्यासाठी आता राज्य राखीव पोलीस दलाला (एसआरपी) परभणीत पाचारण करण्यात आले आहे़ एसआरपीची तुकडी सोमवारी रात्रीच दाखल झाली असून, बुधवारपासून प्रत्यक्ष उपाययोजना सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळाली़

कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे़ या काळात सकाळी ७ ते १० हा वेळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना उपलब्ध करून दिला असला तरी त्यानंतरही दिवसभर शहरात वाहनांची वर्दळ दिसून येत आहे़ विशेष म्हणजे संचारबंदीबरोबरच जिल्हाधिका-यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्त्यावर वाहतूक करण्यास एका आदेशान्वये प्रतिबंध घातला आहे़

मागील १५ दिवसांपासून शहरात संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे़ तरीही नागरिकांना गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळेच आता थेट एसआरपीची कुमक पोलीस दलाने मागविली असून, ही कुमक परभणीत दाखल झाली आहे़ शहरातील रस्त्या-रस्त्यांवर एसआरपीचे पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत़ जिल्ह्याला प्राप्त झालेल्या एसआरपीच्या तुकडीपैकी कोतवाली, नानलपेठ आणि नवा मोंढा या  तिन्ही पोलीस ठाण्यांना प्रत्येकी १ प्लाटून वितरित करण्यात आली आहे़ त्याचसोबत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे़ त्यामुळे आता परभणीतील नागरिकांना शिस्त लावण्याचे काम एसआरपीच्या माध्यमातून केले जाणार आहे़

पोलीस दलाकडून अनेक उपायसंचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विविध उपाययोजना केल्या़ सुरुवातीला नागरिकांना घरी बसण्याची विनंती करण्यात आली़ त्यानंतर दंडुक्याचा प्रसादही देण्यात आला; परंतु, तरीही रस्त्यावरुन फिरणा-या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याने दोन दिवसांपासून शहरातील सर्व रस्ते बॅरिकेटस् टाकून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत़ सुमारे ७० रस्त्यांवर लाकडी बॅरिकेटस् टाकले आहेत़ त्यानंतरही रस्त्यावर वाहन दिसल्यास वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे; परंतु, या कारवाईनंतरही रस्त्यावर फिरणााऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली नसल्याने आता एसआरपीला पाचारण करण्यात आले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी