coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:08 IST2020-07-21T14:07:51+5:302020-07-21T14:08:23+5:30
शहापूर येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी
परभणी : तालुक्यातील शहापूर येथील एका ३५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा सोमवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कोरोनाचा हा चौदावा बळी ठरला आहे.
शहापूर येथील ३५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने १२ जुलै रोजी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या व्यक्तीचा सोमवारी रात्री ८ च्या सुमारास मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यत कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू मृत्यू झाला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०५ झाली आहे. त्यातील १९३ जण कोरोनामुक्त झाले असून १९८ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.