coronavirus : धक्कादायक ! गंगाखेड येथील ४१ वर्षीय कोरोनाबाधित ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:12 PM2020-08-03T15:12:07+5:302020-08-03T15:16:02+5:30

ही वार्ता गंगाखेड येथे धडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह कार्यालयातील सहकाऱ्यांना जबर धक्का बसला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.

coronavirus: Death of Coronavidit Rural Development Officer at Gangakhed | coronavirus : धक्कादायक ! गंगाखेड येथील ४१ वर्षीय कोरोनाबाधित ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू

coronavirus : धक्कादायक ! गंगाखेड येथील ४१ वर्षीय कोरोनाबाधित ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे२२ जुलैला कोरोनाबाधित आढळून आले होते.दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल

गंगाखेड: गंगाखेड तालुक्यातील ४१ वर्षीय ग्रामविकास अधिकाऱ्याचा परभणी येथील खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील बळीराजा कॉलनी मधील रहिवाशी ४१ वर्षीय ग्रामविकास अधिकारी दि. २२ जुलैला कोरोनाबाधित आढळून आले. सुरुवातीला त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने त्यांना शासकीय रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

ही वार्ता गंगाखेड येथे धडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह कार्यालयातील सहकाऱ्यांना जबर धक्का बसला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सुप्पा व चिलगरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ते ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तालुका सरपंच संघटना तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: coronavirus: Death of Coronavidit Rural Development Officer at Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.