Coronavirus : सेलूतील कोरोनाबाधित व्यापाऱ्याचा परभणीत उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 11:01 IST2020-07-09T11:00:56+5:302020-07-09T11:01:41+5:30

सोमवारी त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Coronavirus: A corona positive trader in Selu dies during treatment in Parbhani | Coronavirus : सेलूतील कोरोनाबाधित व्यापाऱ्याचा परभणीत उपचारादरम्यान मृत्यू

Coronavirus : सेलूतील कोरोनाबाधित व्यापाऱ्याचा परभणीत उपचारादरम्यान मृत्यू

ठळक मुद्देउपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

सेलू : शहरातील मोंढ्यातील कोरोना बाधित ६० वर्षीय व्यापा-याचा उपचारा दरम्यान परभणीतील जिल्हा रूग्णालयात बुधवारी रात्री मुत्यू झाला आहे. 

शास्त्रीनगरातील रहिवासी तथा मोंढयात व्यापार करणा-या ६० वर्षीय व्यक्ती आजारी पडल्याने उपचार घेण्यासाठी सोमवारी परभणी येथील दवाखान्यात गेले होते. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने जिल्हा रूग्णालयात त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा स्वॅब अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

परभणीत उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. सदरील व्यक्तीला हदयविकाराचा ञास होता. त्यांच्या सहवासातील ११ जणांना बुधवारीच क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेतले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली. 

Web Title: Coronavirus: A corona positive trader in Selu dies during treatment in Parbhani