शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परभणीकरांना मोठा दिलासा; दिल्लीहून परतलेल्या तिघांचेही अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:11 IST

परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

परभणी : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या परभणी शहरातील तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दिल्ली येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अलर्ट झालेल्या जिल्हा प्रशासनाने परभणी जिल्ह्यातून किती नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले, याची माहिती घेतली असता परभणीतील तिघे दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परभणीत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तिन्ही जणांना जिल्हा रुग्णालयात आणून मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत त्याच दिवशी  पाठविण्यात आले होते. 

या संदर्भातील अहवाल गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये तिन्ही जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या तिन्ही जणांच्या संपर्कात जिल्ह्यातील पाच जण आले होते. त्यापैकी एक जण राजस्थानमध्ये गेला असून, अन्य चार जणांचे स्वॅबही घेऊन ते पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी