coronavirus : Another police officer in Parbhani tested positive; Bori Police Thane Seal | coronavirus : परभणीत आणखी एक पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह; बोरी पोलीस ठाणे सील

coronavirus : परभणीत आणखी एक पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह; बोरी पोलीस ठाणे सील

बोरी : येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीला सील करण्यात आले असून,तात्पुरत्या छावणीतून आता पोलीस ठाण्याचा कारभार सुरू करण्यात आला आहे़

येथील महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह बारा जणांना गावातील ज्ञानोपासक शाळेत क्वारंटाईन केले आहे़ जिंतूर पोलीस ठाण्याचा कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षक ए़एल़ शेख यांच्याकडे सोपविण्यात आला़ त्यानंतर २७ मे रोजी सायंकाळी ठाण्याला सील ठोकण्यात  आले़ आता पोलीस ठाण्याचा कारभार याच परिसरात उभारलेल्या छावणीतून सुरू झाला आहे़ पोलीस ठाण्यातील १२ अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन झाल्याने केवळ १५ कर्मचाऱ्यांवर कामकाज चालविले जात आहे़
 

Web Title: coronavirus : Another police officer in Parbhani tested positive; Bori Police Thane Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.