Coronavirus : परभणीत पाच तासात कोरोनामुळे दुसरा बळी; एकूण मृत्यू १६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:36 IST2020-07-22T12:36:18+5:302020-07-22T12:36:52+5:30

पूर्णा शहरातील शास्त्री नगर भागातील ६१ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

Coronavirus: Another death of coronavirus in five hours in Parbhani; Total deaths 16 | Coronavirus : परभणीत पाच तासात कोरोनामुळे दुसरा बळी; एकूण मृत्यू १६

Coronavirus : परभणीत पाच तासात कोरोनामुळे दुसरा बळी; एकूण मृत्यू १६

परभणी : पूर्ण शहरातील शास्त्री नगर भागातील ६१ वर्षीय कोरोनाबधित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ५ तासांत जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

पूर्णा शहरातील शास्त्री नगर भागातील ६१ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे १८ जुलै रोजी अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यास नांदेड येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनाचा हा १६ वा बळी ठरला आहे. यापूर्वी आजच सकाळीच ६ वाजता परभणी शहरातील इकबाल नगर येथील एका ७५ वर्षीय कोरोनाबधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Coronavirus: Another death of coronavirus in five hours in Parbhani; Total deaths 16