Coronavirus : परभणीत ५५ वर्षीय कोरोना संशयिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 10:26 IST2020-07-30T10:24:40+5:302020-07-30T10:26:47+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus: A 55-year-old corona suspect died in Parbhani | Coronavirus : परभणीत ५५ वर्षीय कोरोना संशयिताचा मृत्यू

Coronavirus : परभणीत ५५ वर्षीय कोरोना संशयिताचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८७ झाली आहे.

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या साडेगाव येथील एका कोरोना संशयित व्यक्तीचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला आहे. 

परभणी तालुक्यातील साडेगाव येथील एका ५५ वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीला २९ जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर या व्यक्तीचा स्वॅब घेऊन तो तपासण्यासाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच गुरुवारी सकाळी सहा वाजता या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८७ झाली असून त्यातील २६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Coronavirus: A 55-year-old corona suspect died in Parbhani