coronavirus : परभणी जिल्ह्यात ५० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या १८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 18:44 IST2020-07-23T18:44:19+5:302020-07-23T18:44:40+5:30

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५८ झाली आहे़

coronavirus: 50-year-old coronavirus patient dies in Parbhani district; Total death toll at 18 | coronavirus : परभणी जिल्ह्यात ५० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या १८ वर

coronavirus : परभणी जिल्ह्यात ५० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या १८ वर

ठळक मुद्देजिल्ह्यातील २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत़

परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर येथील एका ५० वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा गुरुवारी उपचारादरम्यान येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.  

परभणी येथील प्रभावती नगर भागातील ७० वर्षीय महिला २२ जुलै रोजी सायंकाळी ७़३० च्या सुमारास कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती़ २३ जुलै रोजी सकाळी ६़१५ वाजता या महिलेचा मृत्यू झाला़ त्यानंतर दुपारी सेलू तालुक्यातील वालूर येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला़ या व्यक्तीला १२ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ बुधवारीही जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

जिल्ह्यात आतापर्यंत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५८ झाली आहे़ त्यातील २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत़

Web Title: coronavirus: 50-year-old coronavirus patient dies in Parbhani district; Total death toll at 18