coronavirus : परभणी जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १५४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 19:23 IST2020-07-07T19:23:02+5:302020-07-07T19:23:18+5:30

सेलू तालुक्यातील तीनही नवीन रुग्ण कोरोनाबाधित बँक अधिका-याच्या संपर्कातील आहेत़

coronavirus: 5 new coronaviruses found in Parbhani district; The total number of patients is 154 | coronavirus : परभणी जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १५४ वर

coronavirus : परभणी जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १५४ वर

ठळक मुद्देजिल्ह्यातील १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले

परभणी : जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यात परभणी शहरातील २, सेलू शहरातील २ आणि सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे़ 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, दररोज रुग्ण आढळत आहेत़ मंगळवारी ५ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यामध्ये परभणी शहरातील गंगापूत्र कॉलनीतील ४५ वर्षीय महिला, गुलाब अली नगरातील ६० वर्षीय महिला, सेलू शहरातील शास्त्री नगर येथील ३० वर्षीय युवक, मोंढा परिसरातील ५७ वर्षीय व्यक्ती आणि तालुक्यातील रवळगाव येथील २९ वर्षीय युवकाचा समावेश आहे़. सेलू तालुक्यातील तीनही नवीन रुग्ण कोरोनाबाधित बँक अधिका-याच्या संपर्कातील आहेत़ जिल्ह्यात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५४ एवढी झाली आहे़ त्यापैकी १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़
 

Web Title: coronavirus: 5 new coronaviruses found in Parbhani district; The total number of patients is 154