coronavirus : परभणीत ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 13:04 IST2020-07-30T13:03:13+5:302020-07-30T13:04:05+5:30

उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

coronavirus: 32-year-old coronavirus patient dies in Parbhani | coronavirus : परभणीत ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू

coronavirus : परभणीत ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता २७ झाली आहे.

परभणी : येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंगाखेड येथील ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा ३० जुलै रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

गंगाखेड येथील ३२ वर्षीय कोरोनाबाधित तरुणास २८ जुलै रोजी परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता २७ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून जिल्हावासीयांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.
 

Web Title: coronavirus: 32-year-old coronavirus patient dies in Parbhani