Coronavirus : परभणीत कोरोनाचा १७ वा बळी; ७१ वर्षीय बाधिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 10:02 IST2020-07-23T10:02:29+5:302020-07-23T10:02:54+5:30

परभणी शहरातील प्रभावती नगर येथील रहिवासी असलेल्या ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू

Coronavirus : 17th death of Corona in Parbhani; 71-year-old patient dies | Coronavirus : परभणीत कोरोनाचा १७ वा बळी; ७१ वर्षीय बाधिताचा मृत्यू

Coronavirus : परभणीत कोरोनाचा १७ वा बळी; ७१ वर्षीय बाधिताचा मृत्यू

परभणी : शहरातील प्रभावती नगर भागातील ७१ वर्षीय कोरोनाबधित महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता मृत्यू झाला. 
     
परभणी शहरातील प्रभावती नगर येथील रहिवासी असलेल्या ७१ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने २२ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या महिलेचा गुरुवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास मृत्यू झाला. 

जिल्ह्यात कोरोनाचा हा १७ वा बळी ठरला आहे. यापूर्वी १६ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ४५७ कोरोनाबधित रुग्णांची संख्या झाली असून त्यातील २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Coronavirus : 17th death of Corona in Parbhani; 71-year-old patient dies