coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा १५ वा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 09:22 IST2020-07-22T09:21:19+5:302020-07-22T09:22:37+5:30
शहरातील इकबाल नगर येथील रहिवासी असलेल्या ७५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा १५ वा बळी
ठळक मुद्देजिल्ह्यात ४४८ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
परभणी : शहरातील इकबाल नगर येथील ७५ वर्षीय कोरोनाबधित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास मृत्यू झाला.
परभणी शहरातील इकबाल नगर येथील रहिवासी असलेल्या ७५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने १८ जुलै रोजी रात्री ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाचा हा १५ वा बळी ठरला आहे. यापूर्वी १४ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ४४८ कोरोनाबधित रुग्णांची संख्या झाली असून त्यातील २०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.