परभणीतील २ प्रभागात आज कोरोना चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:49+5:302021-04-17T04:16:49+5:30
शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात प्रभाग क्रमांक ४ व १५ मध्ये १ हजार पेक्षा जास्त ...

परभणीतील २ प्रभागात आज कोरोना चाचणी शिबिर
शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात प्रभाग क्रमांक ४ व १५ मध्ये १ हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संशयितांच्या चाचण्या वाढविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या अनुषंगाने १७ एप्रिल रोजी प्रभाग ४ मध्ये वृंदावन कॉलनी, मारुती मंदिर, मंगलमूर्ती नगर, गणपती मंदिर, दुर्गा देवी मंदिर, कॅनल जवळ तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, मोहिते गॅरेज, खानापूर फाटा, शंकर नगर, मारुती मंदिर येथे हे शिबिर होणार आहे. या प्रभागातील नागरिकांनी स्वतः व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी कोविड तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.