कोरोनाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST2021-06-20T04:14:12+5:302021-06-20T04:14:12+5:30

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांचे मृत्यू अजूनही थांबले ...

Corona killed three in the district | कोरोनाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

कोरोनाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांचे मृत्यू अजूनही थांबले नाही. शनिवारी जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात दोन आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या तीन रुग्णांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आरोग्य विभागाला १ हजार ८६६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ४६६ अहवालांमध्ये ७ आणि रॅपिड टेस्टच्या ४०० अहवालांमध्ये ५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजार ५९३ झाली असून, त्यापैकी ४९ हजार ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात ७२ रुग्णांना सुटी झाली.

Web Title: Corona killed three in the district