बेफिकीर तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:33+5:302021-04-13T04:16:33+5:30

परभणी : घराच्या बाहेरही पाऊल ठेवलेला नसताना अनेक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे प्रकार परभणीत ...

Corona is growing among children and seniors due to carefree youth! | बेफिकीर तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना!

बेफिकीर तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना!

परभणी : घराच्या बाहेरही पाऊल ठेवलेला नसताना अनेक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे प्रकार परभणीत घडले आहेत. तरुण मंडळी विनाकारण घराबाहेर फिरते. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना कोरोना संसर्गाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन, सॅनिटायझरचा वापर या बाबीही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, कामानिमित्त आणि काम नसताना घराबाहेर पडणारी तरुण मंडळी ‘मला काही होत नाही’ या आविर्भावात प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाही. घरी गेल्यानंतरही आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. परंतु, त्याचा फटका मात्र घरातील ज्येष्ठ मंडळी आणि बालकांना सहन करावा लागत आहे. यातून स्वत:चे कुटुंबच अडचणीत आणण्याचा प्रकार होत आहे. तेव्हा कामानिमित्तच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. तेव्हा नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळतात. त्यांना कोरोना कसा झाला, याचा साधा विचार केला तरी बाधित कुटुंबातील युवकांकडे लक्ष जाते. हे युवक घराबाहेर पडतात आणि त्यांच्या माध्यमातून घरातील इतर मंडळी बाधित होत असल्याचे दिसून येत आहे.

लहान मुलांच्या बाबतीतही हेच होत आहे. मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुले घरातच आहेत. मात्र, घरातील एका व्यक्तीला कोरोना झाला की, त्याची बाधा मुलांपर्यंत पोहोचत आहे. अशी उदाहरणेही शहरात आता जागोजागी दिसू लागली आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांनीच आता कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.

घरात जाण्यापूर्वी स्नान करावे, शक्यतो सर्व कपडे त्याच दिवशी भिजवून धुण्यासाठी द्यावेत. मोबाइल, बेल्ट, पॉकेट सॅनिटाइझ करून घ्यावे.

घरामध्ये वावरत असताना शक्यतो मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून काही अंतर ठेवूनच संवाद साधावा. घरीदेखील मास्क वापरावे.

बाहेरून घरी आल्यानंतर वाफ घ्यावी. सॅनिटायझरच्या साह्याने हात स्वच्छ धुवावेत. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Web Title: Corona is growing among children and seniors due to carefree youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.