दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST2021-06-09T04:21:59+5:302021-06-09T04:21:59+5:30
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोलच्या दरवाढीने शंभरी ओलांडली आहे, तर डिझेल ९२ ...

दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपावर आंदोलन
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोलच्या दरवाढीने शंभरी ओलांडली आहे, तर डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. यूपीए सरकारच्या काळातील तेलाच्या किमतीशी तुलना करता जवळपास पन्नास टक्के दरवाढ मोदी सरकारच्या काळात झाली आहे. त्यामुळे हे सरकार जनतेचे नसून मूठभर धनदांडग्या उद्योगपतींचे आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, बाळासाहेब फुलारी, रामभाऊ घाडगे, गुलमीर खान, नगरसेवक सुनील देशमुख, नागेश सोनपसारे, विनोद कदम, अमोल जाधव, महेमूद खान, श्रीधर देशमुख, सचिन जवंजाळ, अकबर जागीरदार, अब्दुल सईद अहमद, अतिक उर रहेमान, संतोष सावंत, विनय बांठीया, सुरेश देसाई, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.