लोखंडी खांबाला धडकून कम्पाउंडरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST2021-04-20T04:17:42+5:302021-04-20T04:17:42+5:30
परभणी : शहरातील उड्डाणपूल पोलीस चौकीसमोरील लोखंडी खांबाला धडक दिल्याने दुचाकीवरील कम्पाउंडरचा मृत्यू झाल्याची घटना २७ मार्च रोजी घडली ...

लोखंडी खांबाला धडकून कम्पाउंडरचा मृत्यू
परभणी : शहरातील उड्डाणपूल पोलीस चौकीसमोरील लोखंडी खांबाला धडक दिल्याने दुचाकीवरील कम्पाउंडरचा मृत्यू झाल्याची घटना २७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल २१ दिवसांनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. परभणी शहरातील एका खासगी दवाखान्यात लक्ष्मण आश्रोबा गिरी हे कम्पाउंडर म्हणून काम करीत होते. २७ मार्च रोजी दवाखान्यातील काम आटोपून रात्री ९ च्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच २२ एल ८३२५) कृषिनगर येथील घरी जात असताना उड्डाणपूल पोलीस चौकीसमोरील लोखंडी खांबाला त्यांनी जोराची धडक दिली. या अपघातात गिरी यांना गंभीर मार लागला. उपचारासाठी त्यांना ॲटोचालक महेंद्र व ऋषिकेश सावंत या दोघांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी १७ एप्रिल रोजी मयत लक्ष्मण गिरी यांचे जावई अनंता गिरी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी निष्काळीपणे वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत लक्ष्मण गिरी यांच्यावर गुन्हा दाखल केला.