शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:19 IST

परभणी जिल्ह्यात पोलिसांचे गुरुवारी पहाटे कोंबिंग ऑपरेशन

- राजन मंगरुळकरपरभणी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने गुरुवारी पहाटे तीन ते सकाळी सहापर्यंत गुन्हेगारांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या तसेच विविध न्यायालयीन वॉरंटमधील आरोपींना शोधून काढत त्यांची धरपकड करण्यात आली. यामध्ये दीडशे फरार आरोपींना गजाआड करण्यात आले तसेच अवैध शस्त्र धारकांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत हे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये अग्निशस्त्र व घातक शस्त्रांचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनमध्ये वॉरंट व गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एकूण १५० आरोपींना अटक केली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींच्या घर झडतीतून चार तलवारी, एक खंजीर जप्त करण्यात आले. यामध्ये शेख जावेद शेख साहेब लाल, सोनूसिंग पुनमसिंग टाक, माखनसिंग पूनमसिंग टाक, लक्ष्मण किशन माने अशा चौघांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच गुन्हे करण्याच्या उद्देशाने ओळख लपवून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या चार जणांवर महाराष्ट्र पोलिस कायदा १२२ प्रमाणे गुन्हे नोंद केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी अधिकारी, २५ अधिकारी, अंमलदार तसेच १९ ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, १९० अंमलदारांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Police Nab 150 Fugitives Ahead of Municipal Elections

Web Summary : Ahead of municipal elections, Parbhani police arrested 150 absconding criminals during a combing operation. Illegal weapons were seized, and cases were registered against offenders under the Arms Act and Maharashtra Police Act.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६Crime Newsगुन्हेगारी